Belagavi

कडोलीत नवरात्र उत्सवाला धार्मिक विधींनी सुरवात

Share

कडोली येथील अत्यंत जागृत ग्राम देवता श्री कल्मेश्वर देवाचा ५ आक्टोबर विजयादशमीला साजऱ्या होणाऱ्या ऐतिहासिक दसरोत्सवाच्या धार्मिक विधी कार्याला सोमवार दि.२७/०९/२२ रोजी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात झाली.

यानिमित्त प्रथम मंदिर व परिसराची स्वच्छता करुन रंगरंगोटीसह सजावट करुन आकर्षक विद्युत अलंकार व दिपालंकार करुन देवाची अत्यंत सुंदर अशी आरास करण्यात आली होती. दिवसभर भाविकांचे दर्शन व तेल वाढण्यासाठी गर्दी होती. सायंकाळपासुन धार्मिकविधीला सुरुवात होईपर्यंत भजन सेवा झाली.
रात्री दहा नंतर देवस्की कमिटी पदाधिकरी,हक्कदार कमिटी पदाधिकारी,पुजारी ग्रामस्थ व भाविक भक्तांच्याउपस्थीत विविध वाद्यांसह पालखी उत्सवासह प्रदक्षिणा घालण्यात आली. पारंपारिक धार्मिक विधी व विधिवत पूजा झाल्यानंतर पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता झाली.

असे हे पारंपारिक धार्मिक विधी कार्य विजया दशमी दसर्याच्या सांगतापर्यंत दरोज सुरूच राहणार आहेत. दुर्गा माता मुर्तिचेही डाल्बिसह मिरवणुकीने आगमन होऊन प्रतिष्ठापना करण्यात आली. हक्कदार कमिटी अध्यक्ष मधु पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली.

Tags:

kadoli navratri