अथणी तालुक्यातील बुर्लहट्टी या गावातील विहिरी आणि कूपनलिकांमध्ये श्री रेणुका साखर कारखान्याचे दूषित पाणी मिसळत आहे. यामुळे रोगराई पसरत असल्याचा आरोप करत आज बुर्लहट्टी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले.
व्हॉइस : रेणुका साखर कारखान्यातील राख, कंपोस्ट, आणि प्रदूषित पाणी बुर्लहट्टी गावातील शेतकऱ्यांच्या विहीरती तसेच कूपनलिकांमध्ये मिसळत आहे. या दूषित पाण्यामुळे या भागात पिके धोक्यात येत आहेत. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होत आहे. याच भागात डिसलरी आणि दारूभट्टी असल्याने यामुळेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कारखान्याच्या इतर उत्पादनामुळेही पर्यावरणाचे नुकसान होत आहे. कारखान्यातील निवडुंग आणि कंपोस्टचा पाण्यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान होत आहे. या दूषित पाण्यामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. या साऱ्या समस्यांचा पाढा वाचत संतप्त शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन छेडले. (फ्लो)
या गावातील शेतकरी सिद्धाप्पा आडळट्टी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले, या विषारावर चर्चा करण्यासाठी आपण गेलो असता आपल्याला बाहेर पाठवण्यात आले. दिवसभर कारखान्याबाहेर थांबून आम्ही वाट पहिली मात्र आमच्या समस्या कोणीही ऐकल्या नाहीत. आमच्या समस्या सांगण्यासाठी गेल्यास गुंड बोलावून दमदाटी करण्यात येते. रेणुका शुगर्समुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अनेकवेळा विनंती करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत संताप व्यक्त केला. ()
यावेळी दानप्पा आडळट्टी, हणमंत आडळट्टी, बसनिंग आडळट्टी, चन्नबसप्पा आडळट्टी, लक्ष्मण आडळट्टी, सोमनिंग आडळट्टी, अशोक आडळट्टी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.


Recent Comments