Chikkodi

चिकोडी येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

Share

कागवाड तालुक्यातील जुगुळ गावातील केएसएस शाळेत २०२२-२३ सालच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पंचायत बेळगाव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, चिकोडी उपसंचालक कार्यालय, कागवाड विभागीय शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच कर्नाटक शिक्षण समिती कन्नड माध्यम प्राथमिक आणि माध्यमिक शाळा जुगुळ यांच्या संयुक्त विद्यमाने के एस एस प्राथमिक शाळेच्या प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

या स्पर्धेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. के एस एस व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष विलास कडोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आलेल्या या स्पर्धेच्या प्रमुख अतिथीपदी शिक्षण विभागाचे उपसंचालक एम एल हंचाटे हे उपस्थित होते. याचप्रमाणे कागवाड विभागीय शिक्षणाधिकारी एस बी जोगळे, कागवाडचे प्रभारी शारीरिक शिक्षणाधिकारी एम.वाय. पुजारी कागवाडचे माजी शारीरिक शिक्षणाधिकारी व्ही एस चनाळ यांच्यासह जुगुळ ग्रामपंचायत अध्यक्षा कलावती अगसर, उपाध्यक्ष काकासाब पाटील, कागवाड तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष कृष्णाबाई नंद्याळे, शारीरिक शिक्षक एल वाय चौगुला, सी एम संतोष, एम के कांबळे, एस एम कांबळे, के व्ही कांबळे, कराटे मास्तर राजू पाटील यासह विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

 

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत गायिले. केएसएस माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एम सी हुगार यांनी स्वागत केले. डी. एस. ऐनापुरे, व्ही एन गोटूर यांनी आभार मानले. तर श्रीमती बी एस जलपूर यांनी समारोप केला.

Tags:

chikkodi karate