हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुडस गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात अज्ञात मुलाचा शिरविरहित मृतदेह आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याचे बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी सांगितले.


हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरण्यकेशी नदीत अनोळखी मुलाचा मृतदेह सापडल्याप्रकरणी एसपी डॉ. संजीव पाटील यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. 10 ते 12 वर्षे वयाच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने हुक्केरी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास केला होता. मुलाच्या कमरेला बांधलेले कापड शाळेच्या गणवेशाचा टाय असल्याची बाब उघडकीस आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान यमकनमर्डी पोलीस ठाण्यात या मुलाच्या हरवल्याची नोंद झाल्याचा मेळ आहे. याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्वतंत्र पथके रचून या प्रकरणाचे गूढ उकलण्याचे काम सुरु केले आहे. याप्रकरणी एका आरोपीला यापूर्वीच ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आहे. यावेळी आरोपीने मुलाचा खून केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, आरोपी नुरुद्दीन कोन्नूर याने हा खून प्रकरण लपवण्यासाठी त्याचा मित्र हनुमंत देवन्नूर याची मदत घेतली होती. यावेळी त्यांनी पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. त्याने मुलाचा गळा कापून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शाळेचा गणवेश काढला आणि बॅग सोबत नेली. त्यानी शाळकरी मुलाची सायकल विहिरीत फेकली. ही माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. पुढील तपासातून मुलाचे शिर शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाइट
गोकाक डीएसपी, सर्कल इन्स्पेक्टर मोहम्मद रफिक तहसीलदार, हुक्केरी पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वरचे पोलिस निरीक्षक प्रल्हाद चेन्नगिरी यांच्यासह या प्रकरणाचा तपास करण्यात यशस्वी झालेल्या गोकाक डीएसपीच्या टीमच्या कार्याचे एसपी संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.


Recent Comments