Belagavi

पारिशवाड येथे शाळा खोल्यांचे डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन

Share

आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते खानापूर तालुक्यातील पारिशवाड येथील चार शाळा खोल्यांचे उदघाटन करण्यात आले.

होय, पारिशवाड गावातील शासकीय वरिष्ठ कन्नड प्राथमिक शाळेतील दोन खोल्या, त्याचप्रमाणे शासकीय वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेतील दोन खोल्यांचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी सरस्वती देवीच्या फोटोचे पूजन केले.

यावेळी विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थीनी होऊन रमलेल्या आमदार निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: