श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्राला प्रारंभ करण्यात आला.
आज घटस्थापनेच्या निमित्त विशेष अलंकार करण्यात आला.
नवरात्रोत्सवानिमित्त कपिलेश्वर मंदिरात देवीची विशेष आरास करण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले.
तसेच उद्या मंगळवार दिनांक 27-9-2022 सायंकाळी ठीक 7 वा दक्षिण काशी मंदिरात असुरमर्दिनीच्या मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडणार आहे.
यावेळी भव्य अशी आतषबाजी करण्यात येणार आहे.


Recent Comments