निपाणी तालुक्यातील मांगूर गावात मंडप डेकोरेशन साहित्याच्या गोदामाला आग लागून गोदामातील सुमारे दीड कोटी रुपयांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.


मांगूर गावातील सांगाव रोडलगतच्या सिद्धिविनायक मंडप डेकोरेटर्स या मंडप साहित्याच्या गोदामाला अचानक आग लागल्याने सुमारे दीड कोटी रुपयांचा माल पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना काल दुपारी घडली.

दिगंबर राऊत, जयसिंग राऊत, आप्पासाहेब राऊत यांच्या मालकीच्या या गोदामात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गोदामातील विद्युत उपकरणे, पडदे, दिवाबत्ती, सजावटीचे साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे दिसताच स्थानिक तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही. जवाहर साखर कारखाना-सदलगा, निपाणी अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments