Belagavi

एआयएमआयएम जिल्हाध्यक्षपदी मसूद आलम सनदी

Share

एआयएमआयएमच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदी मसूद आलम सनदी यांची राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी नियुक्ती केल्याची माहिती राज्य सरचिटणीस लतीफखान पठाण आज बेळगावात पत्रकार परिषदेत दिली.

बेळगावात आज, रविवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना लतीफखान पठाण म्हणाले, मी एआयएमआयएम पक्षाच्या बेळगाव जिल्हाध्यक्षपदावर होतो. मात्र आता माझी प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याने ते पद रिक्त होते.

आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असादुद्दीन ओवेसी यांनी आता मसूद आलम सनदीर यांची बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद जैन डोणी यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा मोठा असल्याने चिक्कोडीतही काम करण्यासाठी सय्यद झाकीर हुसेन कादरी यांची संसदीय पदाधिकारी 1 म्हणून चिक्कोडी मतदारसंघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाध्यक्ष ओवेसी यांच्या आदेशानुसार आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काम करणार आहोत. त्याद्वारे ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. बेळगावात येणाऱ्या सर्व निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनाही तोच संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला एआयएमआयएम पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

POLITICS