बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील बुदीगोप्प क्रॉसजवळ ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले.


होय, सौंदत्ती तालुक्यातील बुदीगोप्प क्रॉसजवळ ट्रक-कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी भीषण अपघात होऊन त्यात चार जण जागीच ठार झाले. बाची-रायचूर राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून, कारचा चालक आणि दोन प्रवासी आणि दुचाकीवरील आजी अशा चौघांचा मृतांत समावेश आहे.
कुडची पोलीस स्थानकाचे एएसआय परशराम हलकी यांच्या पत्नी रुक्मिणी, मुलगी आणि चालक असे कारमधील तिघे तर दुचाकीवर बसलेल्या आजीचा जागीच मृत्यू झाला. यरगट्टीकडे जाणारी कार आणि बेळगावच्या दिशेने येणारा सिमेंटवाहू ट्रक यांच्यात धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात कारचा पूर्ण चुराडा झाला. यावेळी यरगट्टीकडे जाणाऱ्या दुचाकीलाही या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली वृद्धा जागीच ठार झाली, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारमध्ये पाच तर दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असल्याची माहिती आहे. बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी बैलहोंगल, मुरगोड, नेसरगी, यरगट्टी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे. मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments