Belagavi

एसपी संजीव पाटील यांच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट

Share

बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट काढून पैसे मागितल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

होय, बेळगाव जिल्ह्याचे एसपी डॉ. संजीव पाटील यांच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट काढून पैसे देण्याची विनंती केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे सायबर भामट्यानी किती मजल मारली आहे हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, स्वतः एसपी डॉ. संजीव पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती शेअर केली आहे. कोणीतरी माझे नाव व फेसबुक प्रोफाईल वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून जनतेकडून पैसे मागत असल्याचे आढळून आले आहे.

याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. जनतेला अशा खात्यांची विनंती नाकारण्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे असे एसपी पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Tags:

FAKE ACCOUNT POLICE