Belagavi

मतभेद बाजूला सारून एकजुटीने कामाला लागा : सतीश जारकीहोळी

Share

भाजप पुलवामा अटॅक, सर्जिकल स्ट्राईक करण्यावर भर देतो. आपल्या समस्या पुढे आल्यास मंदिर-मस्जिदीचा प्रश्न पुढे करून गोंधळ माजवितो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांनी भविष्यासाठी आतापासूनच तयार राहावे, असे आवाहन केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी केले.

 

निपाणी मतदार संघातील बोरगाव येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क सभेत ते बोलत होते. कोणाची ताकद अधिक आहे.. कोण पक्षाच्या बाजूने काम करेल त्यांच्या पाठीशी पक्ष कायम असेल. त्यांना मोठे करण्याचे काम काँग्रेस करेल, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी भाजपावरही त्यांनी निशाणा साधला. पुलवामा अटॅक, सर्जिकल स्ट्राईक अशा गोष्टी भाजप करतो. मात्र आपल्या समस्या आल्या कि मंदिर मस्जिदीचे मुद्दे पुढे करून वाद निर्माण करण्यात येतात. या साऱ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हव्यात. मंदिर मस्जिद हि आपली समस्या नाही. शेतकऱ्यांना खत, बियाणे मिळावे, नागरी समस्या सोडविण्यात याव्यात या आपल्या समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.

 

बोम्मई सरकारच्या काळात अनुसूचित जाती – जमातीचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. हि बाबदेखील जनतेच्या लक्षात आली पाहिजे. हे काम कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. कोणत्याही समस्या सोडविण्यासाठी मतभेद बाजूला सारून एकत्रित काम करणे आवश्यक असल्याचे जारकीहोळी म्हणाले, काँग्रेस हायकमांडने कुणालाही उमेदवारी दिली तरीही त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन एकसंघपणे काम करावे, २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेसला विजयी करण्यासाठी अभियान सुरु करण्यात आल्याचेही जारकीहोळी म्हणाले.

 

यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, नेते अण्णासाहेब आदींसह इतर काँग्रेस समर्थक उपस्थित होते.

Tags:

POLITICS