Belagavi

कर्नाटकात पीएफआय वाढण्यामागे सिद्धरामय्याच कारण : आ. अभय पाटील

Share

काँग्रेस पक्षाने देशात पीएफआयच्या वाढीला प्रोत्साहन दिले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पीएफआयवरील खटला मागे घेतल्याचा गंभीर आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला आहे.

बेळगावात शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, सिद्धरामय्या यांनी पीएफआयवर घातलेला खटला मागे घेतल्याने राज्यात पीएफआयला बळ मिळाले आहे. पीएफआयने देशाच्या विरोधात काम केले. काँग्रेस सरकार आमच्या मागे आहे हे त्यांना माहीत होते.

पण आज सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे पाहिल्यास कळेल की, त्यांना दधील दिली असती तर येत्या आणखी दोन वर्षांत संपूर्ण देशात गदारोळ माजविण्याची ताकद त्यांनी विकसित केली असल्याचे ते म्हणाले.

पीएफआय ही देशात अशांतता निर्माण करणारी समाजकंटक आणि समाजविघातक संघटना आहे. त्यामुळे यापूर्वी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी पीएफआय कार्यकर्त्यांविरोधातील 2000 हून अधिक केसेस मागे घेतल्या होत्या.

आज कर्नाटकात पीएफआय एवढा वाढला आहे त्याचे कारण म्हणजे काँग्रेस आणि सिद्धरामय्या. आता मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चांगले काम केल्याबद्दल आणि पीएफआयला धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद देतो. यामुळे हा देश आणि समाजाचे नक्कीच चांगले होईल असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

Tags:

POLITICS