Belagavi

कंग्राळ गल्लीत दसऱ्यानिमित्त दुर्गादेवी पालखी सोहळा

Share

दसऱ्याच्या औचित्याने बेळगाव शहरातील कंग्राळ गल्ली येथील डॉ. बी आर आंबेडकर मार्ग श्री दुर्गादेवी रेणुका मातंगी यात्रा कमिटीच्या वतीने दुर्गादेवी पालखी सोहळा तसेच महाप्रसादाचे आज शनिवारी आयोजन करण्यात आले होते.

 

कंग्राळ गल्ली येथील सिद्राम मेत्री यांच्या घरात आज शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी देवी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

या उत्सवाला १०० वर्षांचा इतिहास असून दसऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी दुर्गादेवी पालखी संपूर्ण बेळगावमध्ये फिरविली जाते. यानंतर याठिकाणी यात्रा भरविली जाते. या यात्रा महोत्सवात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होतात. हि प्रथा आणि संस्कृती पुढील पुढीपर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती दलित नेते मल्लेश चौगुले यांनी दिली.

 

याचप्रमाणे राजू सेट यांनीही या उत्सवाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दुर्गादेवी यात्रा महोत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी देवी दर्शनासाठी आलेल्या अनेक मान्यवरांचा दुर्गादेवी, रेणुकादेवी, मातंगी यात्रा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव काँग्रेस शहर प्रदेशाध्यक्ष राजू सेट, दलित नेते मल्लेश चौगुले आदींसह अनेक मानण्यावर उपस्थित होते.

Tags: