‘पेसीएम’ मोहीम हे काँग्रेसचे घाणेरडे राजकारण असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली आहे.
चित्रदुर्ग येथे आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, काही समस्या असल्यास त्यांनी थेट बोलावे, कागदपत्रे, पुरावे द्यावेत. त्यावर चौकशी करता येईल. कोणतीही कल्पना न करता, पूर्ण तयारी न करता ते सभागृहात येतात. हे त्यांच्या नैतिकतेचे अध:पतन दिसते. नीतिमत्ता न ठेवता नावाला कलंक लावणारा हा कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. जनतेची पर्वा न करता घाणेरडे राजकारण करून सत्तेत येण्याची त्यांची इच्छा आहे. पण कर्नाटकात हे सर्व शक्य नाही. सरकार कायदेशीर कारवाई करेल, असे ते म्हणाले.
निवडणूकपूर्व सर्वेक्षणात राज्यात भाजपला 95 ते 100 जागा मिळू शकतात असा कल आला आहे. सर्व्हे एक किंवा दुसऱ्या प्रकारचा कल देतात. पण जनतेची नाडी आपल्याला माहीत आहे. मीसुद्धा 30-35 वर्षांपासून राजकारणात आहोत. यावेळीही भाजप पुन्हा सत्तेत येईल असा दावा त्यांनी केला.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. पीएफआयच्या कारवायांवर एनआयए आणि राज्य पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे असे बोम्मई म्हणाले.


Recent Comments