Khanapur

खानापूर भाजयुमो सरचिटणीसपदी अभिलाष बाळेकुंदरगी

Share

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खानापूर मंडळाच्या सरचिटणीसपदी हलशी गावातील अभिलाष बाळेकुंदरगी यांची निवड करण्यात आली आहे.

अभिलाष हे गेल्या काही वर्षांपासून उत्साही युवा कार्यकर्ते असून पक्ष संघटनेत सक्रिय सहभाग घेत असून त्यांची तालुका युवा मोर्चा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा युवा मोर्चा प्रभारी प्रकाश शृंगेरी, राज्य सचिव इरण्णा अंगडी, बेळगाव ग्रामीण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष बसवराज नेसरगी व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला.

Tags:

POLITICS