Belagavi

वीरभद्र नगरात घरफोडी; अडीज लाखांचा ऐवज लांबविला

Share

बेळगावच्या वीरभद्र नगरातील एका घरात घरफोडी करून सोन्या-चांदीसह रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केले.

वीरभद्र नगरातील तिसऱ्या क्रॉसवर राहणारे सुभान सनदी यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. सुभान सनदी याच परिसरातील सातव्या क्रॉस वरील पाहुण्याच्या घरी शुक्रवारी रात्री एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. रात्री त्यांनी तेथेच मुक्काम केला. हि संधी साधून चोरटयांनी डाव साधला आहे. रात्री त्यांच्या घरात कोणी नसल्याची खात्री करून चोरटयांनी घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप कापून आतील सोन्याचा नेकलेस, कानातल्या रिंग्ज, अंगठ्या आणि चांदीचे अडीच लाखांचे दागिने आणि २२ हजारांची रोख रक्कम अशा ऐवजावर डल्ला मारला. याबाबत घरमालकाला कळताच त्यांनी स्थानिक नगर सेवक बाबाजान मतवाले यांना फोन करून मार्केट पोलिसांना माहिती दिली. यावेळी मार्केट पोलिसांनी श्वान पथकासह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: