Athani

राज्य महामार्ग रोखून विद्यार्थ्यांचे बडची येथे आंदोलन

Share

केएसआरटीसीच्या बसेस थांबवल्याने विद्यार्थ्यांनी अचानक राज्य महामार्ग रोखून आंदोलन केल्याची घटना अथणी तालुक्यातील बडची गावात घडली.

होय, बडची गावातून दररोज जाणार्‍या विजापूर एक्स्प्रेस बस बडची गावात थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना शाळा-कॉलेजला वेळेवर जाणे कठीण होत आहे. त्यामुळे बस न थांबविण्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी आंदोलन छेडले. त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून मूक आंदोलन करून संताप व्यक्त केला. फ्लो

यावेळी आंदोलकांनी बस चालक व कंडक्टरविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, आम्ही बस थांबवून बसमध्ये विद्यार्थी घेतले तरीही ते आमच्याशी उद्धटपणे वागतात, अशी बस कंडक्टरने आपली बाजू मांडली. आम्ही काहीही न बोलताही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला

सुमारे अर्धा तास राज्य महामार्ग रोखून रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Tags: