Belagavi

बेळगावमध्ये पौरकार्मिक दिन साजरा  पौरकार्मिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

२३ सप्टेंबर हा स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आज बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचारी दिनाच्या निमित्ताने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला.

बेळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी आणि सुशोभीकरणासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. परिसर स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी २३ सप्टेंबर हा स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून सरकारने घोषित केला असून मनपातर्फे दरवर्षी यादिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दोन वर्षानंतर आज पुन्हा स्वच्छता कर्मचारी दिन साजरा करण्यात आला.

बेळगावमधील पोलीस मैदानात या कामगारांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याहस्ते करण्यात आले. दररोज कामात व्यस्त असणाऱ्या पौरकार्मिकांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पौरकार्मिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धांचा आनंद लुटला. (फ्लो)

यावेळी डॉ. रुद्रेश घाळी बोलताना म्हणाले, पौरकार्मिकांसाठी आजचा दिवस खास आहे. या कर्मचाऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. पौरकार्मिकांच्या पाठीशी प्रशासन असून आजच्या कार्यक्रमासाठी मनपा कर्मचारी आणि नगरसेवक स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. ()

यावेळी क्रिकेट सामन्याचेही आयोजन करण्यात आले होते. पत्रकार, पोलीस आणि महामंडळाचे कर्मचारी यांनीही या सामन्यात सहभाग घेतला. (फ्लो)

दररोज शहराची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज पौरकार्मिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचा आनंद लुटला.

Tags: