आपल्या राज्याचे गतवैभव पुनरुज्जीवित व्हावे आणि आजच्या तरुणाईला गतवैभवाची माहिती मिळावी या उद्देशाने यंदा बेळगाव शहरात मोठ्या उत्साहात नाडहब्ब दसरा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती केएलईचे संचालक डॉ. एच. बी. राजशेखर यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, राज्य दसरा समिती उत्सवाचे सचिव जोरापुर यांनी दसऱ्याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव साजरा झाला नाही. मात्र यंदा भव्य कार्यक्रम साजरा करण्याचा उद्देश ठेवून, राज्याचे गतवैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी दसरा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकाच्या दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उत्सवाच्या माध्यमातून कर्नाटकचे साहित्य, संस्कृती आणि गतवैभवाची माहिती मिळावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा दसरा उत्सवाचे ९५ वे वर्ष असून या उत्सवासाठी अनेक लोकांनी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. २६ सप्टेंबरपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून पाच दिवस हा उत्सव चालणार आहे. बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. सी. के. जोरापुर यांनी माहिती देताना सांगितले, सिद्धाराम महास्वामी यांच्याहस्ते २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. बेळगावमधील चळवळी आणि हा उत्सव कशापद्धतीने साजरा केला जायचा याबद्दल विशेष कार्यक्रम होणार असल्याची माहिती जोरापुर यांनी दिली.


Recent Comments