बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांना व्हीलचेअरची व्यवस्था करून देण्यात यावी, अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगांना अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येत असलेली अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीलचेअरची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी दिव्यांगांतर्फे करण्यात आली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक मागण्यांसाठी, कामासाठी दिव्यांगांची ये जा असते. याचप्रमाणे अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी अनेक दिव्यांग येत असतात. आजदेखील जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला धडपडण्याची वेळ आली. जिल्हाधिकारी आवारातून पायी चालत कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेण्याची वेळ आली. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेळगावमध्ये अनेक बदल होत आहेत. आता दिव्यांगांची हि मागणीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Recent Comments