Chikkodi

चिक्कोडी शहर स्वच्छ राखण्यासाठी सहकार्य करा : नगराध्यक्ष प्रवीण कांबळे

Share

चिक्कोडी शहर स्वच्छ राखण्यासाठी सर्वांनी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी केले.

चिक्कोडी शहरात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आज शुक्रवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते.

प्रत्येकाने स्वच्छतेबाबत जागरुक राहून चिक्कोडी शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी संघटीत प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, स्वच्छ चिक्कोडी शहर जनजागृती रॅली केसी रोड, बस स्टँड, आदी मार्गांवरून बसव सर्कलपर्यंत काढण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष संजय कवटगीमठ, वर्धमान सदलगे, मुख्याधिकारी डॉ. सुंदर रुगी आदी उपस्थित होते.

Tags: