Belagavi

एल अँड टी बिल कलेक्टरला बुखारी गल्लीत नागरिकांचा घेराव !

Share

कुंदानगरी बेळगावात रहिवाशांना एकामागून एक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील बुखारी गल्लीतील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून गटारीचे सांडपाणी वाहून येत असल्याने रहिवाशांनी एल अँड टी बिल कलेक्टरला घेराव घालून संताप व्यक्त केला.

होय, बेळगावच्या बुखारी गल्लीमध्ये सुमारे 8 महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून पुरवठा होत आहे. ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही पाणी बिल भरणार नाही, असा इशारा बुखारी गल्लीतील रहिवाशांनी दिला आहे. तसेच शुक्रवारीही एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे बिल वसूल करणारे बुखारी गल्लीत आले असता तेथील रहिवाशांनी अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला. आम्ही पाणी बिल भरणार नाही आमचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. अन्यथा खडे बाजार रस्ता रोको करून आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

सुमारे 8 महिन्यांपासून नळामधून ड्रेनेजचे पाणी येत आहे. तक्रार केल्यावर अधिकारी येतात, बघतात आणि जातात. महापालिकेच्या कार्यालयात जाऊन दोन वेळा निवेदन दिले. मात्र आमचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. असे पाणी आपण कसे पिऊ शकतो? आता पाणी बिल मागण्यासाठी अधिकारी आले आहेत. जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही बिल भरणार नाही, असा इशारा रहिवाशांनी दिला.

 

एकंदर एल अँड टी कंपनीच्या बिल कलेक्टरला घेराव घालून बुखारी गल्लीतील रहिवाशांनी आपल्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. मात्र, येथील समस्या सोडविण्यासाठी अधिकारी पुढे येतील का, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Tags: