वकिलांना भविष्यात अधिक सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत. यामुळे वकिलांनी सामाजिक जबाबदारी राखणे गरजेचे आहे असे मत बेळगाव जिल्हा प्रधान आणि सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन एस ए यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील के एल एस राजा लखमगौडा लॉ कॉलेजमध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या प्रतिभा पुरस्कार वितरण – जिमखाना समारोप समारंभात ते बोलत होते. वकिली पेशात कठोर परिश्रम घ्यावे लागतात. हल्ली नवोदित वकिलांना विविध क्षेत्रात प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. सायबर, कायदा, संपत्ती हक्क आणि अधिकार अशा अनेक क्षेत्रात नवोदितांना संधी उपलब्ध असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि वकिली पेशात यशस्वी होण्यासाठी किमान १० वर्षे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला. ( )
कर्नाटक लॉ सोसायटीचे सचिव आणि वकील एस व्ही गणाचारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थ्यांनी उत्तम विद्याभ्यास करून कॉलेजचे नाव पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले. याचप्रमाणे तरुण आणि नवोदित वकिलांनी संयमाने वागावे, व्यवहारात आणि व्यवसायात नैतिकतेचे पालन करावे, युक्तिवादासाठी पूर्णपणे तयारी करावी, योग्य अभ्यास करून आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी रानकधारक आणि धर्मादाय पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ( )
आर एल लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए एच हवालदार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयासंदर्भात माहितीही दिली. १९३९ साली स्थापन झालेल्या महाविद्यालयाने दोन मुख्य न्यायाधीश, ३० हुन अधिक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, दोन प्रसिद्ध मुख्यमंत्री, ऍटर्नी जनरल आणि असंख्य वकील तयार केले आहेत, असे त्यांनी सांगितले. ( )
यावेळी जिमखाना संघाचे अध्यक्ष डॉ. डी प्रसन्नकुमार, फिजिकल डायरेक्टर अमित जाधव तसेच संपूर्ण टीमने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्नेहा कुलकर्णी आणि प्रतिमा कम्मार यांनी ईशस्तवन गायिले. मौनेश बडिगेर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर मानसी जिगजीन्नी यांनी जिमखान्याचा वार्षिक अहवाल सादर केला. क्षमा एन भट आणि प्रियांका यांनी आभार मानले तर समीक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
Recent Comments