Banglore

आ. अभय पाटील यांनी विधानसभेत मांडला ‘लोकमान्य’च्या कर्जवाटपाचा मुद्दा

Share

 अभय पाटील यांनी आज विधानसभेत बेळगावच्या लोकमान्य मल्टिपर्पज कोऑप सोसायटीत झालेल्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला. या संस्थेच्या असुरक्षित कर्जवाटपाची सहकार खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी सभागृहात सरकारकडे केली.

होय, कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यात बस्तान बसविलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधानसभेत आ. अभय पाटील यांनी आज केला. या सोसायटीकडून करोडो रुपयांची कर्जे कोणत्याही सिक्युरिटीविना देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याच कर्मचाऱ्यांच्या नावाने कुठे ३० कुठे ४० कोटी रुपयांची कर्जे कोणत्याही सिक्युरिटी न घेता दिल्याचा आरोप करतानाच संस्थेचे कर्मचारी अविनाश दीक्षित यांच्या नावे  ४० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे सांगितले. अशाप्रकारे किमान ३ हजार कोटी रुपयांची कर्जे वाटून संस्थेच्याच लोकांनी त्याचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला. फ्लो

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आपण २०१६-१७मध्ये केली होती. त्यानुसार सहकार खात्याने चौकशीही सुरु केली होती. मात्र ही संस्था आंतरराज्य म्हणून नोंदली गेल्याने सहकार खात्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे संस्थेच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. पण कायदा धाब्यावर बसवून कर्जवाटप केल्याने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या एकूणच  गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी आ. अभय पाटील यांनी केली.

दरम्यान, सभापती विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या सूचनेवरून सहकार मंत्री सोमशेखर यांनी यावर उत्तर दिले. संस्थेला नोटीस जारी झाली नसून, सहकार खात्याकडून माहिती घेऊन यावर उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.

Tags: