चिक्कोडी उपविभाग आणि महाराष्ट्र घाट परिसरात पावसाचा जोर बराच कमी झाला असून चिक्कोडी उपविभागातील दहा पुलांपैकी सात पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
वेदगंगा नदीवरील भोज-हुन्नरगी, भोजवाडी-कुन्नूर, सिदनाळ-अकोळ आणि भीवशी-जत्राट आणि दूधगंगा नदीवरील कारदगा-भोज, एकसंबा-दानवाड, सदलगा-बोरगाव हे पूल वजा बंधारे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले कल्लोळ-येडूर, दूधगंगा नदीवरील दत्तवाड-मलीकवाड आणि वेदगंगा नदीवरील ममदापूर-हुन्नरगी, कुन्नूर-बारवाड या पूर्व्ज बंधाऱ्यावरून अद्याप वाहतूक सुरु झालेली नाही.
सध्या कोयना जलाशयातून 42,331 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. दूधगंगा नदीतून 12,672 क्युसेक्स तर राजापूर बॅरेजमधून 79,750 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.


Recent Comments