Athani

कोकटनूर (ता. अथणी) येथे बिबट्याचा वावर : ग्रामस्थांची रात्रभर गस्त..!

Share

बेळगाव जिल्ह्यातील लोक बिबट्याच्या वावराने हैराण झाले आहेत. आता बेळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरू झाली आहे. अथणी तालुक्यातील कोकटनूर गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी रात्रभर पाळत ठेवली आहे.

होय, बेळगावच्या गोल्फ कोर्स परिसरात ठाण मांडून एका बिबट्याने लोकांची झोप उडवली होती.

आता अथणी तालुक्यातील कोकटनूर गावात हातात काठ्या घेऊन रात्रभर झोपेचे खोबरे करून ग्रामस्थ गस्त घालत आहेत. गावकरी त्यांची घरे आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी गस्त घालत आहेत.

बिबट्याच्या पावलांचे ठसे सापडल्यानंतर गावात बिबट्या आल्याची अफवा पसरली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असून बिबट्या दिसल्याबाबत वनविभागाचे अधिकारी तपास करत आहेत. अद्याप अधिक माहिती मिळणे बाकी आहे.

Tags:

LEOPARD