Belagavi

उसाच्या फडात गांजा पिकवणाऱ्याला अटक

Share

उसाच्या फडात गांजा पिकवणाऱ्या एका आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात रायबाग पोलिसांना यश आले आहे.

 

रायबाग तालुक्यातील कंकणवाडी गावाच्या हद्दीत उसाच्या फडात बेकायदेशीरपणे गांजा पिकवला जात होता. याबाबत खात्रीलायक माहितीवरून रायबाग पोलिसांनी तेथे छापा टाकून आरोपींसह 15 किलो 200 ग्रॅम वजनाची 15,400 रुपये किंमतीची गांजाची 5 रोपे जप्त केली.

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. अथणीचे डीएसपी श्रीपाद जल्दे यांच्या मार्गदर्शनाखाली रायबाग सीपीआय एच. डी. मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाला या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

रायबाग पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.

Tags:

CRIME