चिक्कोडी जेएमएफसी कोर्टाने अवैध दारू विक्री करणाऱ्याला 3 वर्षे सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला.

चिक्कोडी तालुक्यातील जैनापूर गावातील आनंद महादेव गरबुडे असे दोषी आरोपीचे नाव आहे. 24-09-2015 रोजी अबकारी उपनिरीक्षक व्ही.ए. कल्लीकड्डी यांनी जैनापूर क्रॉसजवळ बेकायदेशीर बिअर विकल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. उत्पादन शुल्कचे तत्कालीन उपनिरीक्षक डी.एन. मब्रुमकला यांनी अंतिम आरोपपत्र सादर केले.
न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करत आरोपी आनंद गरबुडे याला कर्नाटक अबकारी कायदा 1965 चे कलम 32, 34 नुसार तीन वर्षे कारावास आणि 20 हजार दंडाची शिक्षा चिक्कोडी न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील गंगाधर पाटील यांनी युक्तिवाद केला.
मंजुनाथ नेसरगी यांनी कोर्ट कॉन्स्टेबल म्हणून काम केले होते, असे चिक्कोडी उत्पादन शुल्क उपायुक्त जगदीश एनके यांनी प्रसिद्धीपत्रकात कळविले आहे


Recent Comments