धारवाड कृषी विद्यापीठाचा कृषी मेळा सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. यावेळी या दरम्यान एक दुर्मिळ प्रसंग पाहायला मिळाला. चक्क एका कुत्र्याने रक्तदान करून दुसऱ्या कुत्र्याचा जीव वाचवला आहे.
चार्ली नावाच्या कुत्र्याने धारवाड येथील कृषी विद्यापीठाच्या कृषी मेळाव्यात रक्तदान करून माया नावाच्या कुत्र्याचे प्राण वाचवले. आपल्या चार्ली नामक कुत्र्याकडून रक्तदान करून मालक सोमशेखर यांनी मानवतावादी कार्य केले आहे. विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या माया नावाच्या कुत्र्याला रक्ताची गरज होती. डॉक्टरांच्या आवाहनानुसार त्यांनी येऊन चार्लीकरवी रक्तदान केले. सध्या माणसांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. प्राण्यांनाही रक्ताची गरज असते हे सत्य आहे. या परिस्थितीत
चार्ली नावाच्या या मूक प्राण्याने रक्तदान करून मायाचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Recent Comments