Belagavi

चिक्कोडीत कँडल मार्च काढून उमेश कत्ती यांना श्रद्धांजली

Share

अकाली निधन झालेल्या दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांना चिक्कोडी येथे रविवारी सायंकाळी कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

 

राज्याचे वन, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर काल, रविवारी सायंकाळी चिक्कोडी शहरात कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. युवा नेते विश्वनाथ कामगौडा यांच्या नेतृत्वाखाली उमेश कत्ती यांच्या शेकडो चाहत्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन प्रवासी मंदिरापासून बसव चौकापर्यंत कँडल मार्च काढला. बसव चौक येथे दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

 

यावेळी विनोद माळगे, संतोष जोगळे, लक्ष्मण पुजारी, संदीप माने, अमर चौगला, विनायक कुमार, रंजीत चव्हाण, ओंकार शेंडुरे, उदय कलिंगे, रूपेश सुगाटे, अक्षय कागुडे, बसू कुमार, विनायक पुजारी, सदाशिव कमते, श्रीधर, उदय कलिंगे तसेच मोठ्या संख्येने कत्ती यांचे चाहते उपस्थित होते.

Tags:

umesh-katti-candle-march-shradhanjali