विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या मुस्लिम समाजातील महिलांना वैद्यकीय उपचारांसाठी सरकारकडून 1 लाख रुपये मदत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन धर्मादाय, हाज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले.
चिक्कोडी शहरातील होसापेट गल्लीजवळील मुस्लीम समाजाच्या दफनभूमीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी सरकारकडून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमीपूजन केल्यावर बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, राज्य सरकारने अल्पसंख्यांक समुदायाच्या विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. त्यापैकी मुस्लिम समाजाच्या महिलांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची योजना एक आहे. त्याचा पात्र महिलांनी लाभ घ्यावा.
यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्षा प्रवीण कांबळे, उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, चिक्कोडी जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा शांभवी अश्वथपुरे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष आदम गणेशवाडी, संतोष जोगळे, अन्वर दाडीवाले, विश्वनाथ कामगौडा, सद्दाप्पा आदी उपस्थित होते.
Recent Comments