Belagavi

बेळगावमध्ये ‘सेवंती उदय’ उत्सव उत्साहात

Share

‘उदय’ या कन्नड वाहिनीवरील सेवंती या मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत बेळगावमधील नेहरू नगर जिरगे सभागृहात रविवारी “सेवंती उदय” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील नेहरू नगर येथील जिरगे ऑडिटोरियममध्ये आयोजिण्यात आलेल्या “सेवंती उदय” या कार्यक्रमात बेळगावमधील असंख्य महिला संघ, महिला मंडळाच्या सदस्यांनी हजेरी लावली होती. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले होते. खासदार मंगल अंगडी आणि आमदार अनिल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात बोलताना खासदार मंगल अंगडी म्हणाल्या, बेळगावमध्ये उदय वाहिनी उत्तम कार्यक्रम सादर करून लोकप्रिय झाली आहे. आपण ज्यावेळी घरी राहायचो त्यावेळी नेहमी टीव्ही मालिका पाहत होतो. मात्र आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना टीव्ही पाहण्यासाठी वेळ मिळत नाही मात्र उदय वाहिनीवरील कार्यक्रम हे प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत असून त्यांच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देत असल्याचे खासदार म्हणाल्या.

याचप्रमाणे आमदार अनिल बेनके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, दररोज सायंकाळी अनेक महिला टीव्ही मालिका पाहण्यात व्यस्त असतात. त्यामुळे यावेळी पुरुष मंडळींना एक तर शांत राहावे लागते किंवा मालिका संपल्यावर घरी यावे लागते अशी परिस्थिती असल्याचे सांगितले. बेळगावमध्ये अशापद्धतीचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.


यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या आवडत्या कलाकारांसोबत नृत्य करण्याचा मनमुराद आनंद लुटला.

Tags:

ENTERTAINMENT EVENT SEVANTI UDAYA UTSVA