Belagavi

लिंगायत संघटनांनी साजरी केली हुगार मादय्या जयंती

Share

बेळगावमधील लिंगायत संघटनेच्या वतीने शरण हुगार मादय्या जयंती तसेच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

बेळगावमधील फ गु हळकट्टी भवनात लिंगायत संघटनेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार आणि शरण हुगार मादय्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२२ साली शासनाने सन्मानित केलेल्या उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सुशीला गुरव, महाराष्ट्रातील अविनाश भूसकर आणि हुगार समाजाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हुगार यांचा सत्कार करण्यात आला.

 

सत्काराला उत्तर देताना सुशीला गुरव म्हणाल्या, कर्तव्य बजाविताना नम्रपणे आणि समर्पित भावनेने बजावावे. बदलत्या व्यवस्थेनुसार शिक्षणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात मुंबईमध्ये लिंगायत धर्माला घटनात्मक मान्यता मिळावी, यासाठी भव्य जागृती मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश भुसकर यांनी दिली. या मेळाव्यात १० लाखांहून अधिक जनता सहभागी होईल, तसेच कर्नाटकातील लिंगायत मठाधीश आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी आर एल एस महाविद्यालयाचे व्याख्याते बसवराज हुगार यांनी हुगार मादय्या यांच्यासंदर्भात माहिती दिली. ज्याप्रमाणे हुगार मादय्या यांच्या भक्ती आणि समर्पणाचे उदाहरण देत मादय्या यांच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इराण्णा देयन्नावर, डी एस हुगार, शंकर गुडस, शशिभूषण पाटील, व्ही के पाटील, व्ही के पाटील, संगमेष अरळी, एम वाय मेनसिनकाई, शिवानंद ताल्लुर, अडिवेश इटगी, बी बी मठपती, ज्योती बदामी, सुवर्णा तिगडी, अक्कमहादेवी टेंगली आदींसह संघटनेचे सदस्य, हुगार समाजाचे प्रमुख उपस्थित होते. महादेवी अरळी यांनी ईशस्तवन गायिले तर श्रीदेवी नरगुंद यांनी वचन विश्लेषण, सुरेश नरगुंद यांनी आभार मानले.

Tags:

EVENT