Belagavi

हेळवी समाज बेळगाव जिल्हा घटकाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

हेळवी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन हेळवी समाजाच्या बेळगाव जिल्हा युनिटच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

 

प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरांची वंशावळी सांगत, वर्षातील ९ महिने गावोगावी फिरणारा हेळवी समाज शासकीय सुविधांपासून वंचित आहे. याचा निषेध करत आज बेळगावमधील हेळवी समाजाने आपल्या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

 

यावेळी हेळवी समाजाचे राज्याध्यक्ष नागराज गुरुजी बोलताना म्हणाले, आपला समाज प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची वंशावळी सांगतो. वर्षातील ९ महिने गावोगावी जाऊन आपला समाज हे काम करतो. भिक्षेच्या स्वरूपात मोबदला मिळविण्यासाठी आपले आयुष्य खर्चणारा समाज शासकीय सुविधांपासून वंचित आहे.

ब्रिटिशांच्या काळात इंग्रजांनी मदत केल्यामुळे आमच्या समाजाला गुन्हेगार मानले जायचे. मात्र चार वर्षांपूर्वी या समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास केला गेला. मात्र सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे आजतागायत या समाजाचा विचार करण्यात आला नाही. आपल्या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, हेळवी समाज शैक्षणि, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. आपल्या समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

 

यावेळी हेळवी समाजाचे बेळगाव जिल्हा घटकाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

PROTEST SOCIAL