Belagavi

दलित युवतींवरील बलात्कारप्रकरणी बेळगावात आंदोलन

Share

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दलित युवतींवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकणी बेळगावमध्ये डॉ. बी आर आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले,

 

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन दलित बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचे मृतदेह झाडाला लटकवण्यात आले. हि घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी असून या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त होत आहे.

 

युपी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली असून सदर आरोपींनी आपला गुन्हा काबुल केला आहे. या सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत डॉ.बी.आर.आंबेडकर शक्ती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आपली मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 

या संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष लक्ष्मण कोलकार याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हणाले, युपीमध्ये दोन दलित बहिणींवर बलात्कार करून त्यांची उसाच्या शेतात नेऊन निर्घृण हत्या करून मृतदेह झाडाला लटकवले. हि घटना अत्यंत निंदयीय असून या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे. उत्तर प्रदेशातील दलितांना पुरेसे संरक्षण द्यावे, तसेच अनुसूचित जाती-जमाती कायदा मजबूत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

या आंदोलनात बाबू पुजेरी, सागर कोलकार, अजय कर्पणी, लक्ष्मण मेत्री, प्रकाश कोलकार, शंकर कोलकार आदी उपस्थित होते.

Tags: