विजापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली असून, लवकरच व्हीडीसीसी बँकेच्या नवीन 9 शाखा सुरू करण्यात येणार आहेत असे डीसीसी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवानंद पाटील यांनी सांगितले.
विजापूर येथे आज, सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार शिवानंद पाटील म्हणाले की, कोविडमुळे गेल्या वर्षी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले नव्हते. शासन व बँकेच्या अनुदानातून बँकेच्या इमारतीचे काम सुरू आहे. तसेच बँकेच्या जिल्ह्यातील शाखांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे जिल्हाभरात 9 शाखा वाढवण्यात येणार आहेत.
शाखांना यापूर्वीच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय 2.16 लाख शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बंपर ऑफर देण्यात आली आहे. तसेच, बागायतदार शेतकऱ्यांना 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा मानस आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील 2.69 लाख शेतकऱ्यांना 1684 करोड कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 19,500 नवीन शेतकऱ्यांना 113 कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. बँकेने 2021-22 मध्ये 12.95 कोटी निव्वळ नफा कमावला आहे असे त्यांनी सांगितले.


Recent Comments