महाराष्ट्र, पश्चिम घाट भागात आता पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे सीमाभागातील कृष्णा, दूधगंगेसह उपनद्यांमध्ये वाहून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण घटले आहे.

चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांचे पात्र आज एक फुटाने कमी झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दूधगंगा नदीच्या भोजवाडी कुन्नूर, ममदापूर-हुन्नरगी कुन्नूर-बारवाड, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड हे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक अजूनही ठप्प आहे.
दूधगंगा नदीवरील जत्राट-भिवशी, अकोळ-सिदनाळ, सदलगा-बोरगाव, बेडकिहाळ-बोरगाव आणि एकसंबा-दानवाड पुलांवर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाली आहे.


Recent Comments