ऑल इंडिया बीएसएनएल डिओटी पेन्शनर्स असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखेतर्फे बेळगावात आज जिल्हास्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
शहापूरातील बसवेश्वर मंगल कार्यालय (दानम्मादेवी मंदिर) येथे अखिल भारतीय बीएसएनएल डिओटी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने आज रविवारी जिल्हास्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकातील विविध भागातील बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या अधीन ठेवण्यासह पेन्शनच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष आर. बी. तडपट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने बेळगाव येथे एक परिषद आयोजित केली आहे. यात जिल्ह्याच्या विविध भागांसह कर्नाटकातील अनेक भागातून पेन्शनधारक दाखल झाले आहेत. पेन्शन बिल आणि मेडिकल बिलावर यावेळी करण्यात आला. ही बाब महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी सर्व बिले निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत सीएचओ एच. सी. प्रकाश, मुद्द्य्या शिर्के, आर. बी. तडपट्टी, एस. व्ही. पाटील, एस. एस. सारापुरे, एन. एल. भोसले, बी. बी. अंगडी आदी उपस्थित होते.
Recent Comments