अँकर : बेळगाव शहरात आज सहारा फौंडेशन व नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मोफत नेत्रचिकित्सा आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
व्हॉइस : खंजर गल्लीतील सरकारी उर्दू शाळेत सहारा फौंडेशन आणि नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत नेत्रतपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना सलमान मकानदार म्हणाले की, आम्ही सहारा फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करत आहोत. तपासणी, ऑपरेशन आणि औषधेही दिली जात असल्याचे सांगून त्यांनी शिबिराच्या व्यवस्थेबाबत सांगितले.
यावेळी खंजर गल्ली येथील रहिवासी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Recent Comments