पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त विजापुरात ‘देश रक्षा पडे’, ‘आकाश रक्त सहायवाणी’ या संस्थांच्या वतीने डोबळे गल्ली येथील ईश्वर मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ बाबू राजेंद्र नाईक, समाजसेवक श्रीशैल हुटगी, प्रसिद्ध उद्योजक विजय चव्हाण यांनी भेट देऊन देशाचे भविष्य असणारे आपले तरुणच आपली संस्कृती आणि परंपरा वाचवू शकतात, असे सांगितले.
भारताला जगातील सर्वात प्रगत देश बनवण्याचे स्वप्न पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अशा शिबिराचे आयोजन करून आपण आपली सामाजिक जबाबदारी दाखवून दिली आहे अशी प्रशंसा त्यांनी केली.
यावेळी देश रक्षा पडे संघटनेचे संस्थापक रोहन आपटे, पदाधिकारी, ऍड. अजय सूर्यवंशी, विक्रम तांबेकर, प्रेमा कलकुटगी, किरण कोलुरागी, राहुल पाटील, आदित्य बडिगेर, सिद्दू बैरागी, महिला शाखेच्या वसुंधरा देशपांडे, श्वेता, रविता पाटील, जयश्री कन्नूर, सविता तलवार उपस्थित होत्या.
Recent Comments