Belagavi

सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या कराटे बेल्ट परीक्षा

Share

सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या वतीने बेळगावात कराटे कौशल्य प्रदर्शन आणि बेल्ट परीक्षा पार पडल्या.

कॅम्प-बेळगाव येथील लेडीज क्लबच्या सभागृहात शनिवारी सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेच्या वतीने बेळगावात कराटे कौशल्य प्रदर्शन आणि बेल्ट परीक्षा पार पडल्या. यावेळी सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ इंडियन कराटेचे प्रमुख ग्रँडमास्टर नरसिंहन यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

एकूण 50 विध्यार्थ्यानी बेल्ट परीक्षा दिली. त्यात 40 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. 10 विध्यार्थ्यांना येलो बेल्ट प्रदान करण्यात आले. रिया कामने, अर्चना कुरूप, रिद्धी वेर्णेकर, रिया वेर्णेकर, किरण बेलेरी, गिरीश जगन्नावर, सुकेत गलगली आणि निकिता बेळगावकर यांना येलो बेल्ट प्रदान करण्यात आले.

12 कराटेपटूंना ग्रीन बेल्ट प्रदान करण्यात आले. साईराज देसाई, आरव दोशी, शुभम माने, अथर्व आपटेकर व सानिका खटावकर या कराटेपटूंना ऑरेंज, ब्ल्यू आणि पर्पल बेल्ट प्रदान करण्यात आले. यावेळी कराटेपटूंनी ग्रँडमास्टर नरसिंहन आणि चीफ इस्न्ट्रक्टर मधु पाटील यांच्यासमोर कराटे कौशल्याचे प्रदर्शन केले. हे सर्व कराटेपटू चीफ इस्न्ट्रक्टर मधु पाटील, आकाश पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

Tags:

EVENT KARATE COMPITION