CKD MALIKWAD MARGUBAI YATRA
चिक्कोडी तालुक्यातील मलिकवाड गावात मरगुबाई यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मलिकवाड गावात आनंदाचे, शांतता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी मरगुबाई यात्रामहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मरगुबाई मंदिरात देवीच्या मूर्तीला जलाभिषेक, पंचामृत अभिषेक करून नैवैध्य अर्पण करण्यात आला. यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

दुधगंगा नदी तीरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात्रामहोत्सवात भाविक मोठ्या श्रद्धा-भक्तीने सहभागी झाले होते. भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
एकंदरीत मलिकवाड गावात मरगुबाई यात्रामहोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.


Recent Comments