SATISH JARKIHOLI FOUNDATION
युवा नेते राहुल जारकीहोळी यांचे प्रतिपादन
बेळगाव दक्षिण, उत्तर मतदार संघात खुर्ची, साउंड सिस्टमचे वितरण
सर्व समाजातील गरीब, मागासलेल्या व तरुणांच्या प्रगतीसाठी सतीश जारकीहोळी फाउंडेशन २४ तास कार्यरत राहणार आहे असे प्रतिपादन युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी केले.

शहरातील जाधव नगर कार्यालयात बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील मशिदी, मंदिरे आणि चर्चसह विविध समुदायांच्या कम्युनिटी हॉलमध्ये २००० हजार खुर्च्या आणि २० साउंड सिस्टीमचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

सतीश जारकीहोळी फाऊंडेशन हे केवळ बेळगाव जिल्ह्यापुरते मर्यादित नसून जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील तरुणांना पोलिस, आर्मी, केएएस, आयएएस प्रशिक्षणासह विविध प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी प्रशिक्षण घेऊन आपल्या जीवनाला आकार द्यावा असे आवाहनदेखील राहुल जारकीहोळी यांनी केले. आपले वडील, केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांचा सल्ला घेऊन अधिकाधिक लोकांना याचा लाभ व्हावा, यासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सतीश जारकीहोळी फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील विविध समाजातील मशिदी, मंदिरे, चर्च यांना दर महिन्याला ५ हजार खुर्च्या व ५० साउंड सिस्टीम देण्यात येत असून हा उपक्रम निरंतर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कुडची म्हणाले, समाजात अनेक श्रीमंत राजकारणी आहेत. प्रत्येकाला माणसांची काळजी नसते. पण केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासारखा साधा, सामाजिक विचार असलेला नेता आपल्या पाठीशी आहे हे यमकनमर्डी आणि बेळगावच्या जनतेचे भाग्य आहे. अभियांत्रिकी पदवीमध्ये ९८% गुण मिळवणाऱ्या राहुल जारकीहोळी यांचा समाजापुढे एक आदर्श असून जनसेवेत स्वतःला राहुल जारकीहोळी यांनी झोकून दिले आहे, असे कुडची म्हणाले.
यावेळी दक्षिण मतदार संघाचे काँग्रेस नेते परशुराम ढगे, बेळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रदीम एम. जे, आमदार सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मलागौडा पाटील, बेळगाव ग्रामीण काँग्रेस एससी युनिटचे अध्यक्ष अनंत ब्याकूड, राजू कोला यांच्यासह बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील विविध देवस्थाने, मशिदी, चर्च आणि विविध समाजाच्या समुदाय भवनांना खुर्च्या, आणि साउंड सिस्टीमचे वितरण करण्यात आले


Recent Comments