कर्नाटक लॉ सोसायटी संचालित मॅनेजमेंट एजुकेशन अँड रिसर्च विभागाचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. AISIMER चे दिवंगत रावसाहेब बी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केएलएस मॅनेजमेंट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगावचे ख्यातनाम उद्योजक स्नेहम इंटरनॅशनलचे अनिल मेत्राणी यांचा २०२२ सालचा उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महिला विभागात गंधर्व प्रोडक्ट्सच्या शिल्पा चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला.
एडीआयएस सीईओ टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ सुजित हुक्केरीकर, यांचा उदयोन्मुख उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी बेंगळूरमधील उद्योजक चेतन, प्रशासकीय मंडळातील तेजस्विनी अनंतकुमार आदी प्रमुख अतिथीही म्हणून उपस्थित होते. बेळगाव के एल एस चे अध्यक्ष प्रदीप सरकार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी तेजस्विनी अनंतकुमार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, के एल एस विद्याथ्यांमुळे अनेकांना स्फूर्ती मिळते. मॅनेजमेंट विद्यार्थ्यांसमोर देशातील समस्या सोडविण्यासाठी अनेक संधी आहेत. युवा शक्ती हि देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शक्तीचा अतुलनीय स्रोत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.


Recent Comments