Hukkeri

वेळीच उपचारांमुळे क्षयरोगापासून मुक्ती मिळते : डॉ. मकानदार

Share

क्षयरुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळाल्यास या आजारापासून मुक्ती मिळू शकते, असे शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. मकानदार यांनी सांगितले.

हुक्केरी शहरातील नगरपालिकेच्या सदस्यांसाठी ‘क्षयरोग प्रतिबंध’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज केले होते. त्याचे उदघाटन करून बोलताना डॉ. मकानदार यांनी ‘क्षयरोग प्रतिबंध आणि नगरसेवकांचे कर्तव्य’ या विषयावर व्याख्यान दिले.

ते म्हणाले की, क्षयरोग हा प्राणघातक आजार नाही, रोगाची लक्षणे त्वरीत आढळून आल्यास, योग्य मार्गदर्शनाखाली सरकारी दवाखान्यात उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, सतत खोकला, थुंकी इत्यादी लक्षणे असलेल्या रुग्णांनी तातडीने सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घेऊन आवश्यक उपचार घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. बाईट यावेळी नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, मुख्याधिकारी मोहन जाधव, तसेच नगरसेवक महांतेश तळवार, मधुकर करणिंग, रुक्मिणी हळीजोळ, ज्योती बडिगेर, सुरेखा गळतीगीमठ, गिरीश कुलकर्णी, राजू कुरुंदवाडे, राजू मुन्नोळी आदी उपस्थित होते.

Tags:

CANCER CORONA TB