बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे एका आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रामदुर्ग शहरातील व्यंकटेश्वर मंदिराजवळील मलप्रभा नदीत एका महिलेने तिच्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह उडी मारून आत्महत्या केली. रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर गावातील रुद्रव्वा बसवराज बन्नुरा वय ३० असे मृत महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन 2 वर्षांच्या मुलांसह नदीत उडी मारून आत्महत्या केली. यामागचे कारण समजू शकलेले नाही. घटनास्थळी दाखल झालेले रामदुर्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आई आणि मुलाचा शोध सुरू केला आहे.


Recent Comments