Belagavi

बेळगावात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले

Share

बेळगाव येथील आझाद गल्ली येथे बाजारात जाणाऱ्या महिलेची फसवणूक करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.

आज शनिवारी दुपारी एक महिला आझाद गल्लीतून जात होती. त्यावेळी काही भामट्यांनी तिला गाठले.  महिलेला भूक लागल्याचे सांगून भामट्यानी जेवायला पैसे मागितले. यावर त्या महिलेने त्यांना पैसे दिले. त्यानंतर महिलेला तिला सोन्याचे दागिने घालू नका. चोर ते चोरू शकतात. त्यामुळे पिशवीत बांधून देतो, असे सांगून दागिने काढायला लावून आपल्याकडे घेतले. नंतर हातचलाखी करून वाळू भरलेली पिशवी तिला देऊन तेथून पळ काढला. या भामट्यांची हि लूटमार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

लक्ष्मी सिद्धप्पा पाटील असे लुटले गेलेल्या पीडित महिलेचे नाव असून तिने रडत रडत आपल्याबाबत झालेल्या फसवणुकीची माहिती दिली. बाइट ही घटना मार्केट पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे, पोलिस तपासातूनच अधिक माहिती मिळणे शक्य होणार आहे.

Tags: