Belagavi

बेळगावातील ज्योतिनगर गणेशपुर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Share

बेळगावातील ज्योतिनगर गणेशपुर येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बेळगांव ग्रामीण मंडळ स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.  

या शिबिराचे उद्घाटन बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. ह्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत, बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने खूप चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. गरीब जनतेला ह्याचा लाभ मिळणार आहे, बाईट

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचा डंका वाजवला आहे. सुशासन आणि पारदर्शी कारभारामुळे जगातील अन्य कुठल्याही देशाच्या प्रमुखांहून अधिक लोकप्रियता मोदींनी मिळवली आहे. बाईट

ह्या प्रसंगी बेळगावच्या खासदार श्रीमती. मंगल अंगडी, बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आ. संजय पाटील, भाजप प्रवक्ते एम. बी. जिर्ली, रामचंद्र मनोळकर आदि उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संदीप ढवाळे, अजय कुरबर, अरुण भोसले, प्रदीप पाटील, सुरेश घोरपडे आदिंनी परिश्रम घेतले.

Tags: