KALABURGI CM FLAG HOISTING
कल्याण कर्नाटक अमृतमहोत्सव दिन
कलबुर्गी येथे आयोजित कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिन-2022 समारंभात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज ध्वजारोहण केले. त्यानंतर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला.


कलबुर्गी जिल्हा प्रशासन आणि कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिन उत्सव समिती कलबुर्गी यांच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत आज पोलीस कवायत मैदानावर कल्याण कर्नाटक अमृत महोत्सव दिन-2022 चा भाग म्हणून आयोजित ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.

केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, राज्याचे उद्योग मंत्री मुरुगेश निरानी, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, फलोद्यान मंत्री मुनिरत्न, केकेआरडीबीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील रेवूर आणि त्या भागातील आमदार व प्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments