उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे असे मत हुक्केरी येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के.एस. रोट्टेर यांनी व्यक्त केले.


आज हुक्केरी येथे कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण, बेंगळुरू तसेच तालुका कायदा सेवा समिती हुक्केरी यांच्या आदेशानुसार तालुका सेवा समिती, महिला आणि बालकल्याण विकास विभाग, हुक्केरी तसेच प्रशासकीय विभाग आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक आहार आणि औषध सेवनासंदर्भात जनतेमध्ये जागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हुक्केरी परिसरातील ईश्वरलिंग देवस्थानाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात न्यायाधीश के एस रोट्टेर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी मंजुनाथ परसन्नवर यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तहसीलदार डी एच. हुशार, महिला कल्याण अधिकारी एन एस नागलोटी, एच होळेप्पा, पर्यवेक्षक शैला पाटील, तालुका आरोग्य शिक्षण अधिकारी महादेवी जकमती, वकील डी के अवरगोळ, एन आय देमन्नवर, बी बी बागी, ए बी तोदल, आशा सिंगाडी आदी उपस्थित होते. यावेळी ऍडव्होकेट के बी कुरबेट यांनी व्याख्यान दिले.

यावेळी गर्भवती महिलांसाठी तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. सशक्त देश घडवण्यासाठी प्रेत्येकाने निरोगी राहणे आवश्यक असून जंक फूडचे सेवन टाळावे, असे आवाहन न्यायाधीश रोट्टेर यांनी केले.
तहसीलदार डॉ. डी. के. एच हुगार यांनी बोलताना सांगितले, कि सरकारने गर्भवती महिलांसाठी पोषक अन्नधान्य वितरणाचा उपक्रम सुरु केला आहे. याचा लाभ प्रत्येक गर्भवती महिलेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या


Recent Comments